LIC विषयी

भारतीय आयुर्विमा महामंडळ

भारतीय जीवन विमा निगम (रोजच्या वापरातील संक्षेपः एलआयसी; हिंदी: भारतीय जीवन बीमा निगम; इंग्लिश: Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.

1956 साली 243 विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची 8 क्षेत्रीय कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 54 ग्राहक सेवा केंद्रे व 25 महानगर सेवा केंद्रे आहेत.

गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या 13,37,064 इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.

मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

ब्रीदवाक्य

ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी

बोधवाक्य

योगक्षेमं वहाम्यहम्. हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे. हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा : अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ ... भगवद्गीता 9-22 अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.

स्थापना

1 सप्टेंबर 1956

मुख्यालय

मुंबई, भारत.

उत्पादने

जीवनविमा, म्युच्युअल फंड, गृहकर्ज

महसूली उत्पन्न

Indian Rupee symbol.svg 13.25 निखर्व

मालक

भारत सरकार

कर्मचारी

1,15,996

संकेतस्थळ

www.licindia.in